Saturday, September 5, 2009

दव


हे दव अंथरले कोणी
भल्या पहाटे चंद्र मावळताना
कुणा ही सुचली खट्याळ कल्पना
निरव निशेच्या संगती कोण श्रम करी
हे दव अंथरले कोणी

धरतीला या आछादाया
शर्यत जणू रवि किरणे करीती
टपोरे थेंब पाहुनी लाल ती होती
किरणे अंगावरती पड़ता हसती गालात जणु
हे दव अंथरले कोणी

फुलांतला मधु चाखाया भ्रमर गिरक्या घेई
चक्री वारा चुकवत पाकळीचा विसावा पाही
भिजलेल्या मखमलीत या पाय निसटता होई
टवटवित पालवित कुठले हे पाण्याचे मणी
हे दव अंथरले कोणी

खिडकीच्या काचेवरी जमली ही पंगत
तिला आतून निरोप घेण्याचीही नाही सवलत
कोण दोन जिवात हा अड़थळा आणी
हे दव अंथरले कोणी

- कवी सर्वेश