Monday, March 1, 2010

कोणी हि स्वप्नात एन्ट्री मारली

उठतोय कसला पडलोय आता चांगलाच
दिसले दिवसा तारे आणि अंगात शिरलेत वारे
सगळे जग जसे गोल फिरतेय
नाही जे जवळ ते जणू दिसतय. . .

जागतोय रात्री झोपतोय दिवसा
लक्ष न कुठे खातोय नुसताच खस्ता
डोक्याचा झालाय भुगा ना आता बुद्धी उरली
कोणी हि स्वप्नात एन्ट्री मारली.. . .

चालता चालता आपटतोय भिंतीवर
खुर्ची समजून बसतोय टेबलावर
आपले समजून जातोय दुसऱ्याच घरी
कोणी हि स्वप्नात एन्ट्री मारली.. .

जिथे जावे तिथे होतोय पचका मित्र पण करतायत निंदा
गादी वरून पडतोय खाली दात घासतोय दोनदा
बिना टॉवेल जातोय आंघोळीला प्यांट घालतोय उलटी
कोणी हि स्वप्नात एन्ट्री मारली. . . ..

लोक आता हसतात झालय काय पुसतात
बहुतेक झाडांशी आणि खांबांशी बोलताना मला बघतात
बघतो एक टक कधी आकाशी तर कधी भूवरी
कोणी हि स्वप्नात एन्ट्री मारली... . .

पाहतो सारखा आरश्यात कपडे घालतो नवे
रोम्यांटिक पुस्तक वाचातान बंद चालू करतो दिवे
उचलतो फोन जरी वाजतेय घंटी दारावरी
कोणी हि स्वप्नात एन्ट्री मारली.. . . .

बघतो प्रत्येक चेहऱ्याकडे शोधतो कुणाला तरी
घडत नाही अद्दल खाऊन देखील दोन गालावरी
एवढे होतय माझ्या बरोबर तरी दया ना कुणा वाटली
कोणी हि स्वप्नात एन्ट्री मारली

- कवी सर्वेश