जिंकाया चाललो आम्ही, हे जग जिंकाया चाललो आम्ही,
न्हाई कुना ची भीती, न्हाई कुनाचे डर,
शुर आम्ही शिलेदार, हाय आम्हा बहाद्दारांची सर.
बांधला फेटा शेंद्री, घोड्यावर निघाली स्वारी,
देह तो सरदारी नि दंड ते भारी,
पहाडी आमचा विश्वास सच्चा करील बाकी कमी ती पुरी.
बा नि दिले बळ, मायेने दिली शिदोरी,
आयेचे काळीज तरी टापावानि आवाज करी,
धाकलि भन बी काळजी पोटी सलते,
पन ते समदे पाठीशी हाय तर मोहिम फत्ते.
पाठीवर हात ठेवून गुरू म्हन पोरे झाली मोठ्ठी,
सांगा कुनी समिन्द्रा पुढे नदी न्हाय का छोटी,
कंबर कसली नि तालीम केली फक्कड,
बिजलि वानी तडकु असे, पडू शेकडोना जड.
नमन करून देवीला टेकवला माथा,
बुद्धी आनि शक्ति संगती हाय, कोण आता नडेल आम्हा,
आय मातीचे पांग फेडू, शत्रूचा त्या कना मोडू.
झटू अन्ता पर्यंत आता, जरी पडला हा जन्म कमी,
जिंकाया चाललो आम्ही, हे जग जिंकाया चाललो आम्ही.

No comments:
Post a Comment