दिवस वाहतो तुज सवे, पण चंद्र तो सरेना,
मनाची ही घालमेल मला उमजेना,
ही रात्र जागताना तुझे स्वप्न वेचीताना ! रात्र जागताना !!
केल्या सर्व शर्था आता मार्ग सापडेना,
कोकिलेच्या सादे वरी नभ बरसेना,
ताणलेल्या डोळ्या मधुनी झोप डोकवेना,
रात्र जागताना तुझे स्वप्न वेचीताना ! रात्र जागताना !!
आठवणी तुझ्या उशाशी निशिगंध दरवळलेला,
एक एक पाकळी जशी ही रंग मावळतीचा,
मख्मली बिछाना तरी मन करमेना,
रात्र जागताना तुझे स्वप्न वेचीताना ! रात्र जागताना !!
नक्षत्रानी भरली ओंजळ सडा तो फुलांचा,
तुज साठी किती करू पण मन हे भरेना,
पाना वरल्या दवा परी ते क्षण वेचताना !!
रात्र जागताना तुझे स्वप्न वेचीताना ! रात्र जागताना !!
श्वासा परी स्पन्दने जशी ही, जीव गुंतला तुझ्याच पाशी,
जड झाले भावनांचे ओझे मला पेलवेना, पापण्यातला ओलावा का तुला दिसेना,
रात्र जागताना तुझे स्वप्न वेचीताना ! रात्र जागताना !!
- कवी सर्वेश
hey.. good one....ताणलेल्या डोळ्या मधुनी झोप डोकवेना ...nice
ReplyDelete