मन कधी सुसाट वारा, जशा वादळी लाटा,
मन कधी आभाळा एवढे विशाल, जशा उंच पर्वत रंगा !!
मन कधी गुरांचा कळप, जसे पावसातले मळभ,
मन कधी हरवलेल्या वाटा, जशा पाटी वरच्या रेघोट्या !!
मन कधी फुलांचा कळ्या तर कधी पुसलेला फळा,
मन कधी आनंदी पहाट तर कधी नुसतेच गोल फिरणारे चर्हाट !!
मन कधी घेते उंच भरारी, तर कधी कोपर्यात दडी मारी,
मन कधी होई बावरे तर कधी दाखवते मार्ग खरे !!
मन कधी आठवणींचा खजिना तर कधी उडालेल्या पक्षाचा पिंजरा,
मन कधी असे तर कधी तसे पण असते ते आपले से आणि जवळचे,
मग छोट्याशा चुकना त्याच्या नाही का माफ करायचे...
No comments:
Post a Comment