
ढग
मेघ दाटून आले वारा सोसाट होता,
फुले हसली मुले नाचत आली,
पाउस गाणी घुमू लागली,
झुले ही सजले खेळ रंगले.
वारा वाहत आला आणि मधेच थबकाला,
या धान्दलीत एक ढग हरवला वाट चुकला,
मित्रान समवे रमत चालला तो धुंदीत निघालेला,
वार्या ने दगा दिला आणि बिचारा मगेच राहिला.
ढग म्हणाला येतो फिरून आजूबाजूचा परिसर येतो जरा पाहून,
जरा बागडून येऊ परत मित्रा कडे असा विचार केला,
एकटाच फिरला नभात बागडला, परत फिराया पहिले वळून दूर पर्यंत पण कुणीच दिसेना.
एकटाच तो दिषाहीन झाला कुठे जावे काहीच कळेना,
मित्र सुटले सोबती ही गेले, सर्वत्र चाचपडले पण कुणीच गवसेना.
एकला कासावीस तो कावरा बावरा निघाला,
आता फक्त आठवणीच राहिल्या जसा फुलांचा गंधच उडाला,
नाही कुणी त्याला पुसायला एकलाच तो पुढे सरला,
धो धो रडला आणि सावळ्याचा शुभ्र झाला.
कुणी न अपुले उरले न कुणी सखे सोयरे,
उसासे टाकत तो एकलाच पुढे सरला,
हताश आणि जिर्ण तो ना त्यात त्राण उरला,
गरगरत्या वार्या मधे अडकून तो नभात विरला............
- कवी सर्वेश
No comments:
Post a Comment