Sunday, July 12, 2009

Dedicated to My office....

नाही संपत त्याला काम म्हणतात

त्याच वाइड स्क्रीन वर डोळे ताणून बसायचे,

कधी उठून प्रिंटर कडे जायचे,

कधी ईमेल तरी कधी क्वचित ऑर्कुट चेक करायचे,

बाजूला मित्र पण याच अवस्थेत असतात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!


मस्त गरम चहा आणि ब्रेकफास्ट चा आइटम टेस्टी असणार,

असे स्वप्न सगळे पाहणार,

खांद्यावर तोच डबा घेऊन येणारा माणूस माझा हिरेमोड करणार,

माहीत नाही लोक कसे हसत हसत खातात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!


पुन्हा मित्र फ्लॉप पिकनिक चे प्लान करणार,

आणि ऐन वेळेस कोणी तरी टांग मारणार,

माधेच बॉस ने डोकावले की हात माउस कडे सरसावणार,

रोज नवीन टार्गेट मिळणार...पण प्लान्स कधीच वेगळे नसतात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!


असेंब्ली ओपन होताना कॉंपोनेंट फेल होणार,

सापडत नाही म्हणून लोकाना घाम फुटणार,

दर वेळेस सगळे नवीन कॅट नंबर बुक करणार,

पण सर्वर चा कचरा कधी साफ करणार,

कधी मधेच येणारे मित्रांचे मेल्स थंड झुळुक बनून येतात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!


रिव्यू मीटिंग मधे बॉस कमरे वर हात ठेवून येणार,

त्याना माहीत असलेला तोच स्टेटस विचारणार,

एक मेकान कडे बघून सगळे मान डोलावणार,

एक संपत नाही तोच नेक्स्ट ऑर्डर ची हिंट देऊन बॉस गेलेले असतात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!


रात्र रात्र जगून टार्गेट कम्प्लिट केले,

दुसऱ्या दिवशी मात्र चेहरया वर दुखी भाव ही नाही दाखवले,

बहुतेक जाताना टेस्टी नाश्ता आणि ऑटो यानी काम केले,

पण रोज थांबावायला एवढे चोचले ही पुरेसे नसतात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!

No comments:

Post a Comment